Ticker

6/recent/ticker-posts

डोंगरीत रजा चेंबर्स इमारत कोसळली

इमारतीचा भाग कोसळून एक मृत्यू

मुंबई, दादासाहेब येंधे : डोंगरीच्या एसटी महामंडळ इमारतीसमोरील म्हाडाच्या उपकरप्राप्त रजा चेंबरच्या धोकादायक रिक्त इमारतीचा काही भाग बुधवारी कोसळून झालेल्या अपघातात एका वृद्धाचा मृत्यू झाला . 

डोंगरीतील रजा चेंबरची उपकरप्राप्त इमारती विकासकाला पुनर्विकास करण्यासाठी देण्यात आली होती. मात्र, त्याचा विकास न झाल्याने बुधवारी सकाळी या इमारतीचा काही भाग कोसळला. यात मुमताज सुधानेवाला (वय-६५) या गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने जेजे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले.  परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.  ही इमारत म्हाडाची उपकरप्राप्त इमारती असून महापालिकेतर्फे ही इमारत धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आली होती.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या