आमचीच बातमी, आम्हाला देण्याची दुर्दैवी वेळ
मुंबई, दादासाहेब येंधे : टीव्ही-९ मराठीचे पत्रकार आणि एबीपी माझा चे माझे सहकारी पांडुरंग मोरे यांचे कोरोना मुळे दुःखद निधन झाले योग्य उपचार न मिळाल्यामुळे त्यांची पुणे येथे प्राणज्योत मालवली.
टीव्ही नाईन मराठी चे पुण्याचे पत्रकार पांडुरंग रायकर (वय-४२) यांचे कोरोनामुळे निधन झाले. वेळेवर सुसज्ज रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे व वेळेवर उपचार न झाल्याने पांडुरंग मोरे यांचे निधन झाले. जेव्हा रुग्णवाहिका मिळाली तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
गेल्या पंधरा वर्षात त्यांनी ईटीवी मराठी, एबीपी माझा व टीव्ही -९ मराठी मध्ये पत्रकार म्हणून उत्कृष्ट काम केले आहे. कोरोना बाबत जनजागृतीचे काम करणाऱ्या एका पत्रकाराचा पुरेशा उपचाराअभावी मृत्यू झाल्याच्या घटनेने राज्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
कोरोनामुळे पत्रकाराचा मृत्यू झाला या घटनेची उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दखल घेत विभागीय आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले असून आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही रायकर यांच्या कुटुंबाला विम्याचे मदत मिळवून देऊ असे आश्वासन दिले आहे.

0 टिप्पण्या