Ticker

6/recent/ticker-posts

कृत्रिम तलावांत शांततेत विसर्जन

कृत्रिम तलावांत ५० टक्के गणेशमूर्तींचे विसर्जन
मुंबई, दादासाहेब येंधे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा साधेपणाने उत्सव साजरा करण्यात आला. अनंत चतुर्थीच्या दिवशी तब्बल २८ हजार घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन यावेळी करण्यात आले. गणेशोत्सव काळात एकूण १ लाख ३५ हजार गणेशमूर्तींचे विसर्जन झाले त्यापैकी ५० टक्के मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले. गणेशोत्सव काळात गर्दी टाळण्यासाठी महापालिकेने विसर्जनाकरिता कृत्रिम तलावांची संख्या पाच पाच पट वाढली होती. तसेच चौपाट्यांवर ही प्रवेशबंदी करीत प्रत्येक विभागात सात ते आठ गणेश मूर्ती संकलन केंद्र सुरू करण्यात आली होती. मुंबईकरांनीही पालिकेच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद देत गणेशमूर्तींचे विसर्जन घराजवळील कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन  केले. पोलिसांनी देखील चौपाटी तसेच मुंबई शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता.





महापौर व आयुक्तांनी मानले आभार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव संपूर्ण सुरक्षितता राखून आणि उत्सवाचे पावित्र्य जपून साजरा करण्याच्या आवाहनाला मुंबईकरांनी दिलेला प्रतिसाद वाखाणण्याजोगा आहे.
संपूर्ण गणेशोत्सव सोहळा तसेच गणेश चतुर्थी दिवशी गणेशमूर्ती विसर्जन हे शांततेत पार पडले यासाठी अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, विविध गणेशोत्सव समन्वय समिती यांच्यासह मुंबईकर जनतेचे महापौर किशोरी पेडणेकर व आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आभार मानले आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या