कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी देशाचा ७३वा स्वातंत्र्य दिन साध्या पद्धतीने शारीरिक अंतर राखत पार पडला. लाल किल्ल्यावर सलग सातव्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी मेक फॉर वर्ल्ड चा नारा देत नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनचीही घोषणा केली. तब्बल ८६ मिनिटांच्या आपल्या भाषणात त्यांनी कोरोनाचे संकट आणि त्यावरील भारतीय लस, आत्मनिर्भर भारत मोहीम, परराष्ट्रनीती, नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन, प्रत्येक गावात फायबर ऑप्टिक विविध विषयांवर विस्ताराने त्यांनी भाष्य केले.
भाषणाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान मोदी यांनी डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, ऍम्ब्युलन्स कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस, अनेक लोक २४ तास आपल्या जीवाची पर्वा न करता काम करत असल्याचे आवर्जुन उल्लेख करून पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या कार्याला नमन केले.
कोरोनाच्या संकट काळात 'सेवा पर्मो धर्मा' ची भावना आपल्या सोबत असल्याचे म्हटले. संकटातही भारताने आत्मनिर्भर बनण्याचा संकल्प केला. अगदी काही महिन्यांपूर्वीपर्यंत एन ९५ मास्क, पीपीई किट, व्हेंटिलेटर्स आपण परदेशातून आयात करत होतो. आज या सर्व वस्तू आपण स्वतःच्या गरजा भागवत इतर देशांनाही पुरवतो आहोत.
आत्मनिर्भर भारत म्हणजे केवळ आयात कमी करणे नाहीतर आपली क्षमता, कौशल्य वाढवायला हवेत. जगातील मोठ-मोठ्या कंपन्या भारतात येत आहेत. मेक इन इंडिया सोबत मेक फॉर वर्ल्ड या मंत्रासह पुढे वाटचाल करायला हवी. कोरोना संकट काळात संशोधनातही भारताने आघाडी घेतली आहे असे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले.
0 टिप्पण्या