Ticker

6/recent/ticker-posts

बोरिवलीत बेस्ट बसची डिव्हायडरला धडक

ब्रेक फेल झाल्याने घडला अपघात

मुंबई, दादासाहेब येंधे : बोरिवलीच्या गोराई ब्रिजवर भिमनगर परिसरात शुक्रवारी गोराई डेपोची ४६१ क्रमांकाची बस मुलुंडहून चारकोपला निघाली होती. रात्री साडेअकराच्या सुमारास बसचा ब्रेक फेल होऊन गाडी रस्ता दुभाजकाला आदळली.

 या अपघातात कोणीही जखमी झाले नसून बसचेे मात्र, पुढील भागाचे नुकसान झाले आहे. बोरिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रवाशांसह चालक गजानन जाधव यांना बसमधून सुखरूप बाहेर काढले.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या