Ticker

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

आरोग्याला प्राधान्य

मुंबई, दादासाहेब येंधे : काल स्वातंत्र्यदिनानिमित्त मंत्रालयातील मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोना रुग्णांना बरे करण्यासाठी अहोरात्र झटणारे डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी आणि पोलिस यंत्रणेत काम करणारे कर्मचारी, स्वच्छता दूत हे खरे कोविड योद्धे आहेत. आपल्यासाठी ते स्वातंत्र्य योद्धे आहेत. या काळातही न डगमगता समर्पित भावनेने ही मंडळी सेवा देत आहेत.

आरोग्य विषयाकडे इथून पुढे प्राधान्याने लक्ष दिले जाणार असून राज्यातील खेड्यापाड्यांमध्ये तसेच दुर्गम भागात उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा आणि वैद्यकीय सुविधा पोहोचण्यास तसेच शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

आपल्या मनोगतानंतर मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी रश्मी ठाकरे, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, आमदार दीपक केसरकर, मुख्य सचिव संजय कुमार, प्रधान सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनिषा म्हैसकर, पोलीस महासंचालक सुबोध जायस्वाल, मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग तसेच विविध विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्यासह कोरोना वर मात केलेले कोरोना योद्धे उपस्थित होते.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या