केंद्राचे राज्यांना आदेश
कोरोनाच्या वाढत्या प्रसाराचा धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारनं देशात लॉक डाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला होता. लॉक डाऊनच्या तीन टप्प्यानंतर अनलॉक घोषित करण्यात आला. जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी केंद्राकडून हळूहळू लॉक डाऊन टप्प्याटप्यानं शिथिल केला जात असून, राज्यातील आणि राज्याराज्यातील प्रवासी व मालवाहतुकीवरील बंदीवरून केंद्रानं राज्यांना फटकारले आहे.
केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी राज्यातील आणि राज्या-राज्यातील प्रवासी व मालवाहतूक सुरू करण्यासंदर्भात एक पत्र लिहून निर्देश दिले आहेत. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अनलॉक तीनच्या नियमावलीचे उल्लंघन करण्यात आले आहे. राज्यांतर्गत व राज्या-राज्यातील वाहतुकीवर कोणत्याही प्रकारची बंधन असायला नकोत असे स्पष्ट केले आहे.
भल्ला यांनी राज्यांना अनलॉक-३ नियमावलीचा संदर्भही दिला आहे. अनलॉक -३नियमावलीतील पाचवा परिच्छेदाचा उल्लेख करत म्हटलं आहे की, "प्रवासी आणि मालवाहतूक यावर कोणतेही बंधन असणार नाही. त्याचबरोबर शेजारील देशांशी करारानुसार सीमापार व्यापार करण्यासाठीही स्वतंत्र परवानगी, ई परमिटची गरज भासणार नाही, असंही स्पष्ट केलं आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये अशाप्रकारे वाहतुकीवर बंधनं घालण्यात आल्याने त्याचा परिणाम वस्तू व मालाचा पुरवठा साखळीवर होत आहे असं भल्ला यांनी म्हटलं आहे.

0 टिप्पण्या