Ticker

6/recent/ticker-posts

रंगारी बदक चाळ गणेशोत्सवाची यंदा ३ फुटांची मूर्ती

समाजासमोर मंडळाचा आदर्श


सरकारी सूचनांचे तंतोतंत पालन

मुंबई, दादासाहेब येंधे : काळाचौकी येथील रंगारी बदक चाळ रहिवासी संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तीन फुटांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आहे.

दरवर्षी मंडळाची १८ फुटांची मूर्ती असते. त्या परंपरेला छेद देत कोरोनाच्या सावटामुळे लाडक्या लंबोदराची लहान मूर्ती तसेच गणेशोत्सवही यावर्षी अगदी साध्या पद्धतीने मंडळ साजरा करीत आहे. मंडपही एकदम लहान आकाराचा बनविण्यात आला आहे, असे मंडळाचे अध्यक्ष श्री. लक्ष्मण देवरुखकर यांनी सांगितले. तसेच उत्सव काळात आरोग्य शिबिराचेही आयोजन करणार असल्याचे मंडळाचे प्रमुख संतोष सकपाळ यांनी कळविले आहे.

तसेच आरती करताना प्रत्येकाने मास्क वापरणे बंधनकारक असून सोशल डिस्टनसिंगचे पालन करण्याची अट मंडळाने प्रत्येक कार्यकर्त्याला घातली आहे.

सरकारी सूचनांचे तंतोतंत व काटेकोर पालन करण्यासाठी गर्दी टाळून संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने २०२० या साली सार्वजनिक गणेशोत्सव चार फुटांपेक्षा कमी उंचीची गणेशमूर्ती साकारून साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे रंगारी बदक चाळ रहिवासी संघ गणेशोत्सव मंडळाने ठरवून समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या