यंदा मंडळाने जपलंय वेगळेपण
मुंबई, दादासाहेब येंधे : चिंचपोकळी येथील चिंचपोकळीचा चिंतामणीची प्राणप्रतिष्ठा सोहळा आज सकाळी पार पडला. यंदा गणेश मंडळाच्या वर्गणीदारालाच दर्शनाची परवानगी मिळणार आहे. शिवाय प्रत्येक इमारतीला एक ठराविक वेळही देण्यात आली आहे. त्यानुसारच स्थानिक वर्गणीदारांना, रहिवाश्यांना दर्शन घेता येणार आहे.
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे १४ फुटांची मूर्ती न बसवता मंडळातील ९ इंचाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तसेच मंडळातर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा रद्द करण्यात आल्या असून यंदा जनआरोग्य वर्ष साजरा करण्याचे मंडळाने ठरविले आहे असे मंडळाचे अध्यक्ष उमेश नाईक यांनी सांगितले.

0 टिप्पण्या