Ticker

6/recent/ticker-posts

मध्य रेल्वेचा दोनशे गाड्यांचा प्रस्ताव

मुंबई : गणेशोत्सवात प्रवाशांसाठी २०० रेल्वे गाडया चालविण्याची तयारी मध्य रेल्वेने केली आहे. या गाड्यांसाठी वेटिंग तिकीट नसेल. कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांना सुरक्षित वावराच्या नियमांचे पालन करून रेल्वेमधून प्रवास करण्याची मुभा असणार आहे. असा प्रस्ताव मध्य रेल्वेने मंजुरीसाठी रेल्वे मंडळाकडे पाठवला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून कोकणासाठी विशेष प्रवासी रेल्वे गाड्यांचे नियोजन मध्य रेल्वेने केले आहे. आगमन-विसर्जनासाठी साधारणपणे एक महिन्यासाठी या गाड्या धावणार असून या गाड्यांना मार्गावरील महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात येईल. असा प्रस्ताव मध्य रेल्वेने रेल्वे मंडळाकडे पाठवला आहे. रेल्वे मंडळाच्या मंजुरीनंतर गाड्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या