Ticker

6/recent/ticker-posts

यंदा गणपती मंडळ टी शर्ट नाही

यावर्षी चिंचपोकळी मंडळाचे टी शर्ट नाही

मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबईमध्ये गणेशोत्सवादरम्यान मागील काही वर्षांपासून मूर्तीसोबतच वेगवेगळ्या मंडळांनी टी शर्ट छापुनही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

यंदा मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे टी शर्ट बाजार थंड असल्याचे निदर्शनास येत आहे. मुंबईतील बऱ्याच मंडळांनी यावर्षी टी शर्ट न छापण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील प्रसिद्ध गणपती मंडळ असलेले चिंचपोकळी या मंडळाच्या 'चिंचपोकळीचा चिंतामणी' च्या अधिकृत टीशर्ट भाविकांमध्ये भरपूर मागणी असते. त्यामुळे केवळ टी शर्ट खरेदी करण्यासाठी हजारो तरुण एकाच ठिकाणी एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही.  त्यामुळे गर्दीचा प्रश्न उदभवू नये म्हणून मंडळाने यावर्षी टी शर्ट न छापण्याचा निर्णय घेतला आहे असे मंडळाचे अध्यक्ष उमेश नाईक यांनी सांगितले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या