Ticker

6/recent/ticker-posts

बोलबच्चन आरोपींना शिवाजी पार्क पोलीस ठाणे यांनी केली अटक

बोलण्यात गुंतवून चोरी करणाऱ्या आरोपींना अटक


मुंबई , दादासाहेब येंधे : दि १६ जून २०२० रोजी फिर्यादी नामे श्री. ऋषिकेश संजय कारकर, वय २० वर्षे यांच्या तक्रारी वरून शिवाजी पार्क पोलीस ठाणे गुरक्र १४३/२०२० कलम ४२०, ३४ भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि. जगताप, गुन्हेप्रकटीकरण पथकाचे पो.ह.सुर्यवशी, पो ना जाधव, पो.शि तायडे, पाटील, कशेले यांना गुप्तबातमीदारमार्फत नमूद गुन्ह्यातील पाहिजे आरोपी हे माटुंगा रेल्वे स्टेशन, सेनापती बापट रोड येथे येणार असल्याची माहिती मिळाल्याने सदरची माहिती मा. वपोनि सो यांना दिली असता मा. वपोनी सो आणि  पोनी गुन्हे उत्तेकर यांनी सदर आरोपी हे सराईत असल्याने जास्तीत जास्त मनुष्यबळ घेऊन जाणे बाबत सूचना दिल्याने सदर परिसरात गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी सपोनि जगताप ,गुन्हे प्रकटीकरण पथक, पोलीस शिपाई सतीश लिंबळे, एटीसी पथकातील पो.ना.साळुंखे पो.शी. गोतमारे व मोबाईल ३ वरील अंमलदार पो.ह.तावडे पो.शि.परदेशी, मोबाईल ०५ वरील अंमलदार पो.ह. प्रदीप पाटील, म.पो.शि.रणदिवे,यांनी सदर ठिकाणाहून सापळा रचून त्यांना ताब्यात घेऊन  पोलीस ठानेस आणले असता त्यांच्या कडे चौकशी केली असता त्यांनी नमूद गुन्हा केल्याचे कबूल केल्याने त्यांना अटक करण्यात आली. संजय दत्‍ताराम मांगडे वय ४७ वर्षे राठी रु न ५०५ गुरुकृपा बिल्डिंग म्हाडा वाशी नाका चेंबूर तसेच राजीव कृष्णा शेट्टी वय ४२ रा.ठी कोकरी आगार रूम नंबर १३४ जय महाराष्ट्र नगर अँटॉप हिल, मुंबई. यांना अटक करून आरोपींकडून सोन्याची चैन जप्त करण्यात आली आहे.         

तसेच आरोपीपैकी आरोपी संजय मांगडे याचा शिवाजी पार्क गुरक्र.  १५८/२०२० कलम ४२०, ३४ भादवि मध्ये सहभाग निष्पन्न झाल्याने त्या नमूद गुन्ह्यात अटक करून मा. न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने दि. २७ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. पुढील तपास सुरू आहे.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या