Ticker

6/recent/ticker-posts

दिंडोशीत रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबईतील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन मंडळांना केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत दिंडोशी विधानसभेच्या वतीने शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तिकर तसेच आमदार, विभागप्रमुख, माजी महापौर सुनील प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली काल (९ऑगस्ट रोजी) केईएम रुग्णालय रक्तपेढीच्या साहाय्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

प्रसंगी सरकारी कर्मचारी, पोलीस बांधव, बेस्ट मधील कर्मचारी यांनी रक्तदान केले. तरुण वर्ग तसेच शिवसेना व अंगीकृत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी मोठया संख्येने रक्तदान केले.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या