अश्लील संभाषण करून महिलेचा विनयभंग - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

सोमवार, १० ऑगस्ट, २०२०

अश्लील संभाषण करून महिलेचा विनयभंग

अंधेरीतून ३८ वर्षीय चालक आरोपीला अटक
   
मुंबई, दादासाहेब येंधे : एक ३२ वर्षीय महिला अंधेरी येथे खाजगी कंपनीत कामाला आहे. मार्च महिन्यात तिला एका अज्ञात व्यक्तीने फोन करून तिच्याशी अश्लील संभाषण केले. सुरूवातीला तिने त्याकडे दुर्लक्ष केले असता आरोपी वारंवार दोन मोबाईल क्रमांकावरून फोन करून तिला मानसिक त्रास देत अश्लील संभाषण करीत होता. त्यावेळी तिने अंधेरी पोलीस ठाणेत जाऊन रितसर तक्रार दाखल केली.

मोबाईल क्रमांक ९७०२१९८८४९. ७७१०९४९८२४  वरून तिच्या कंपनीत अश्लील भाषेत बोलून तिचा विनयभंग केला म्हणून तिने तक्रार दिल्याने अंधेरी पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक १७१/२० कलम ३५४ अ ३५४ ड ५०९ भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पगार व त्यांचे  पथक यांनी सीडीआर, एसडीआर  प्राप्त करून तसेच आयएमईआय सीडीआर प्राप्त करून तपास केला. परंतु, वरील नमूद सर्व मोबाईल क्रमांक हे चोरीचे तसेच नाव व पत्ता चुकीचे वापरून मिळवण्यात आल्याने आरोपी पोलिसांना सहज गुंगारा देत होता . त्यामुळे वरील पथकाने हनी ट्रॅपचा वापर करून आरोपीला पंप हाऊस एमआयडीसी अंधेरी पूर्व मुंबई येथे बोलावले असता दबा धरून बसलेल्या पोलिसांनी मोठया शिताफीने त्याला अटक केली.  आरोपीचे नाव हॅन्ड्री मायकल नाडर उर्फ विवेक वय ३८ असून तो चालक आहे.

सदर घटनेबाबत आरोपीकडे चौकशी केली असता त्याने हुंडाई मोटर्स, मोदी होंडाई, हरे कृष्णा मोटर्स, लक्ष्य अकॅडमी, फोर्ट पॉइंट , मारुती, ब्लू चिप  इत्यादी कंपन्यांच्या ठाणे, मुंबई,  कल्याण, पुणे शहरांमधील वरील कंपन्यांचे कार्यालयांचे गुगल वरुन लँडलाईन नंबर  प्राप्त करून वेळोवेळी कॉल करत असल्याचे सांगितले. तसेच कॉल केल्यानंतर महिलेने फोन उचलल्यानंतर तिच्याशी सुरुवातीला  नियमित गप्पा मारून  त्यानतर त्यांना तो  मसाज करत असल्याचे सांगत होता व  त्यानंतर त्यांच्याशी अश्लील संभाषण करून  विनयभंग करीत असल्याचे त्यांने कबुल केले. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज