घरफोडीतील दोन अटटल चोरटयांना केले जेरबंद
दादासाहेब येंधे : चान्नी आणि पातुर भागातील वाढत्या घरफोडीचे प्रमाण पाहता मा. पोलीसअधिक्षक, अकोला यांनी स्थानिक गुन्हे शाखेस गुन्हे उघडकीस आणनेबाबत निर्देशित केले होते. त्यानुसार पोनि शैलेश सपकाळ, स्थागुशा, अकोला यांनी पोउपनि हटवार व त्यांचे पथकाकडे गुन्हे उघडकीस आणनेची जबाबदारी सोपविली होती.
पोउपनि हटवार व त्यांचे पथकाने गुप्त बातमीवरुन आरोपी (१) सदोसिंग सुधाकर चव्हाण वय.२५ वर्षे रा.दधम ता.खामगांव जि. बुलढाणा (२) मोहन सुरेश चव्हाण वय ३५ वर्षे रा.लोणी ता. मेहकर जि. बुलढाणा यांना त्यांचे बेडयावरून ताब्यात घेवुन सदर दोन्ही आरोपींकडून पो स्टे चान्नी येथील ४ गुन्हे आणि पो स्टे पातुर येथील १ गुन्हा असे एकुण ५ गुन्हे उघडकीस आणुन एकुण ५१ ग्रॅम सोने किं.अंदाजे- २,५०,००० रू. व १७ तोडे चांदी किंमत अंदाजे.-११,००० रू. व एक ओप्पो कंपनीचा मोबाईल किं.अं. ४,००० रू. असा एकुण २,६५,००० रु.मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना ताब्यात घेण्याची जिकरीची कामगीरी पोउपनि. सागर हटवार, पोहेकॉ. प्रमोद डोईफोडे, नापोकॉ. आश्विन शिरसाट, शंकर डाबेराव, फिरोज शेख, पोकॉ. मनोज नागमते, संदिप ताले, संजय निखाडे, अनिल राठोड, मपोशि. भाग्यश्री मेसरे स्थानिक गुन्हे शाखा, अकोला आणि पोकॉ. निलेश चाटे, गोपाल ठोंबरे, गणेश सोनोने, ओम देशमुख सायबर पो स्टे अकोला यांनी केली आहे. याकरीता मा. पोलीस अधीक्षक श्री जी श्रीधर यांचे मार्गदर्शन लाभले. असे जनसंपर्क अधिकारी श्री. सपकाळ, अकोला जिल्हा पोलीस दल यांनी कळविले आहे.


0 टिप्पण्या