राज्यातील मंदिरे पुन्हा उघडा
मुंबई. दादासाहेब येंधे : राज्यभरातील मंदिरे उघडण्यास परवानगी द्या या मागणीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे शनिवारी राज्यभरातील मंदिराबाहेर घंटा आंदोलन करण्यात आले. मॉल, बाजारपेठ, दारूचे दुकान उघडण्याची परवानगी देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने मंदिर उघडण्याची परवानगी न दिल्यास नाईलाजाने परत प्रार्थनास्थळे उघडू असा इशारा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिला. विधानपरिषदेतील विरोधी नेते प्रवीण दरेकर, प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार पक्षाच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांसह विविध धार्मिक संघटना, वारकरी संघटनेचे प्रतिनिधी या आंदोलनात सहभागी झाले होते.
मुंबईत वडाळा येथेही घंटानाद करण्यात आले. यावेळी चित्रा वाघ, शायना एन.सी., आदी नेत्या व कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता. तर मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरासमोरही भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येत थाळीनाद व घंटानाद केला.
0 टिप्पण्या