Ticker

6/recent/ticker-posts

अनलॉक-४ मेट्रोला परवानगी

मेट्रोला परवानगी, ७ सप्टेंबरपासून वाहतूक सुरू होण्याची शक्यता
केंद्र सरकारने लोक डाऊन काळातील निर्बंध आणखी शिथिल केले आहेत. अनलॉक -४ ची घोषणा करताना केंद्रीय गृहमंत्रालयाने वाहतूक तसेच नागरिकांच्या एकत्र येण्याबाबत नियमांमध्ये सूट दिली आहे. यानुसार मेट्रो रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचवेळी राजकीय मेळाव्यांनाही मान्यता दिली आहे. मात्र, शाळा व कॉलेज यापुढेही बंदच राहणार आहेत.

केंद्रीय गृहमंत्रालयाने शनिवारी रात्री काही निर्बंध शिथिल करण्याची घोषणा केली. यानुसार ७ सप्टेंबर पासून टप्प्याटप्प्याने विविध शहरातील मेट्रो सेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

यांना परवानगी
  • १०० जणांसह सार्वजनिक कार्यक्रम
  • शाळा, महाविद्यालयांत ५० टक्के स्टाफ
  • सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळून दुकाने उघडणार
  • ओपन थियटर म्हणजे सर्कस (२१ सप्टेंबर पासून)

हे राहणार बंदच
  • शाळा
  • महाविद्यालये
  • सिनेमागृह
  • कोचिंग क्लासेस
  • जलतरण तलाव






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या