Ticker

6/recent/ticker-posts

चिंचपोकळी चिंतामणी मंडळाचे रक्तदान शिबीर संपन्न




मुंबई, दादासाहेब येंधे : चिंचपोकळीचा चिंतामणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने लोकमान्य टिळक पुण्यतिथी शताब्दी वर्ष व गणेशोत्सवाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास भायखळा विधानसभेचे आमदार यामिनी यशवंत जाधव यांनी विधानसभा संघटक (दाऊ) लिपारे, शाखा प्रमुख हेमंत कदम यांच्यासह सदिच्छा भेट दिली. जन आरोग्य वर्षातील सुरू केलेल्या या विधायक अभियानाचे आमदार यामिनी यशवंत जाधव यांनी कौतुक केले व मंडळाच्या आगामी उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
सामाजिक अंतर राखून रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष उमेश नाईक, सचिव वासुदेव सावंत, कोषाध्यक्ष अतूल केरकर यांच्या नेतृत्वाखाली मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकारणी सदस्य यांच्यासह कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. या शिबिरासाठी वाडिया रुग्णालय रक्तपेढी यांच्या डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या