स्थानिक गुन्हे शाखा, धुळे पोलीसांची कामगिरी
चोरटे मुद्देमालासह जेरबंद.
दादासाहेब येंधे : २० जुलै रोजी रात्री भर्सेन मोटर्स, (गुरूद्धाराजवळ) हे दुकान फोडून त्यातील एका लॅपटॉपसह चार बॅट-यांची चोरी झाल्याची घटना घडली होती. तसेच किमया मोबाईल शॉपी, राजकमल टॉकीजजवळ, धुळे येथे चोरी होऊन तेथील मोबाईल चोरीस गेले होते.
या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा, धुळे कडे समांतर तपास चालू असताना पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी बुधवंत यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सदरचे गुन्हे हे साजीद महेमूद शहा, रा. जामचा मळा, धुळे याने त्याचे साथीदार अकबरअली कैसरअली शहा, सलीम हुसेन सय्यद व बिलाल बापू शहा सर्व रा. धुळे यांच्या मदतीने केले असून त्यातील चोरलेला मुद्देमाल हा त्यांनी जामचा मळा येथील साजीद महेमूद शहा याचे घरात लपवून ठेवलेला आहे.
त्यावरून पथकाने जामचा मळा, धुळे येथे जाऊन बातमीतील नमूद घरावर छापा घालून घरझडती घेतली असता त्या घरात सुमारे ५९,८३०/- रूपये किंमतीच्या चार बॅट-या, एक लॅपटॉप व २७ मोबाईल जप्त केले आहेत. तसेच ही चोरी करणारे साजीद महेमूद शहा व सलीम हुसेन सय्यद दोघे रा. जामचा मळा. धुळे यांना त्याचे राहते भागातून शिताफीने पकडून पुढील कारवाईसाठी धुळे शह पोलीस स्टेशनला हजर केले.
वरील कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री. चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधीक्षक डॉ. श्री. राजू भुजबळ यांचे मार्गदर्शनाखाली स्था.गुन्हे शाखा धुळे चे पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी बुधवंत, पोलीस उप निरीक्षक- हनुमान उगले, पो.हे.कॉ. रफीक पठाण, पो.ना. प्रभाकर बैसाणे, गौतम सपकाळे, राहुल सानप, किशोर पाटील, व चा.पो.ना. दिपक पाटील अशांनी केली असून उर्वरीत आरोपींचा शोध घेत आहोत.

0 टिप्पण्या