Ticker

6/recent/ticker-posts

अलविदा माही...

महेंद्रसिंग धोनीने जाहीर केली निवृत्ती
मुंबई, दादासाहेब येंधे
भारताला दोन विश्वचषक पटकावून देणाऱ्या महेंद्रसिंग धोनीने स्वातंत्र्यदिनाच्या संध्याकाळी अचानकपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. अन क्रिकेट प्रेमींना एक धक्काच बसला. गेल्या एक वर्षापासून धोनीच्या निवृत्तीबाबत चर्चा रंगत होत्या. मात्र, योग्य वेळ आल्यानंतर मी स्वतः निर्णय जाहीर करेल असे सांगणाऱ्या धोनीने स्वतः या चर्चांना पूर्णविराम दिला.
कल्पक नेतृत्व गुण आणि अखेरच्या क्षणापर्यंत सामन्यात रंग भरण्याचा कौशल्यामुळे धोनीने क्रिकेटप्रेमींच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले. त्यामुळे दिग्गज खेळाडू मध्ये गणना होणाऱ्या धोनीच्या या घोषणेनंतर क्रिकेट विश्वातील एका पर्वाचा अंत झाला आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. खूप कमी क्रिकेटपटू असे आहेत. ज्यांची महानता आकडेवारीवरून सिद्ध करता येणार नाही. धोनी त्यापैकीच एक. चतुरस्र कर्णधार, सामन्याच्या परिस्थितीनुसार खेळ करणे आणि क्षेत्ररक्षण या जोरावर त्याने क्रिकेट विश्वाला आपली भुरळ पाडली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या