Ticker

6/recent/ticker-posts

पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यापूर्वीच ७ जणांना पुणे गुन्हे शाखा युनिट ३ ने ठोकल्या बेड्या

आरोपींकडून रिव्होल्व्हर, रायफल, कोयता जप्त


पुणे (दादासाहेब येंधे): पुण्यातील हडपसर परिसरात असलेल्या पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यापूर्वीच सराईत आरोपींसह ७ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या. सदर कारवाई पुणे गुन्हे प्रकटीकरण युनिट 3 च्या पथकाने केली. या आरोपींकडून रिव्हॉल्व्हर, रायफल, कोयत्यासह दरोड्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

या आरोपींना न्यायालयात हजर केले असता ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती युनिट ३ च्या पथकाने दिली. कोरोना संकटात गुन्ह्यांमध्ये वाढ होऊन नये म्हणून पुणे पोलीस आयुक्‍त डॉ. के. व्यंकटेशन यांनी सर्व पोलीस विभागांना कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष ३ च्या पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी पथकातील सपोउनि किशोर शिंदे हवालदार संतोष क्षीरसागर, पोना अतुल साठे यांना रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार विशाल ऊर्फ जंगाल्या श्याम सातपुते हा साथीदारांसोबत पु. ना. गाडगीळ ज्वेलर्समध्ये दरोडा टाकणार असल्याची माहिती खबऱ्याने दिली.

त्या माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी हडपसर परिसरातील मगरपट्टा येथील डॅफोडील
सोसायटीत धाड टाकून विशाल उर्फ जंगल्या शाम सातपुते(३०), सदाशिव सपकाळ (२८), पंकज गायकवाड (३४), राजू शिवशरण(२६), गणेश कुंजीर(२७), 'त्रवषषिकेश पवार(१९), रामेश्वर काजळे(३३) यांच्या मुसक्‍या आवळल्या.

कारवाईदरम्यान झडती घेतली असता पोलिसांना रिव्हॉल्व्हर, पिस्तूल, रायफल, ९ जिवंत काडतूस, एक रिकामी पुंगळी, २ कोयते, फॉरच्युनर कार, क्टिवा, मोबाईल, रोकड, सॅग बग असा एकूण १४ लाख ७४ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.

या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात (गु. र. क्र. १३२०/२०२०) भादंवि कलम ३९९, ४०२ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५), ४(२५) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३, कोविड - १९ उपाययोजना कलम ११ नुसार
गुन्हा दाखल करून सातही जणांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेला विशाल हा कुणाल पोळ खून प्रकरणातील आरोपी असून, त्यावेळी पोलीस १५ दिवसांच्या पॅरोलवर येरवडा  कारागृहाबाहेर आला आहे.

तसेच विशाल विरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोड्याची तयारी व अन्य गुन्ह्यांची नोंद आहे. आकाश सपकाळ हादेखील कुणाल पोळ खून प्रकरणातील आरोपी असून, २०१४ साली जामिनावर तुरुंगाबाहेर आला आहे. तर पंकज गायकवाड याच्याविरुद्ध कोंढवा, पौंड, हडपसर पोलीस ठाण्यांमध्ये खून, कट रचने, रोडो यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. राजू शिवशरण याच्याविरुद्ध वानवडी, हडपसर पोलीस ठाण्यात दुखापत, खून हे गुन्हे दाखल आहेत तर गणेश कुंजीर याच्याविरुद्ध लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

दरोड्यापूर्वीच या सराईत आरोपींना पुणे शहरचे अपर पोलीस आयुक्‍त अशोक मोराळे, गुन्हे प्रकटीकरणचे उपायुक्‍त बच्चन सिंग, सहाय्यक पोलीस आयुक्‍त डॉ. शिवाजी पवार, गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण अडागळे, अंमलदार किशोर शिंदे, दीपक मते, राहुल घाडगे, दत्तात्रय गरुड, गजानन गाणबोटे, संतोष क्षीरसागर, अतुल साठे, मच्छिंद्र वाळके, मेहबुब मोकाशी, प्रवीण तापकिर, सचिन गायकवाड, संदीप तळेकर, कल्पेश बनसोडे, कैलास साळुंखे आदी पथकाने अटक करण्यात मोलाची कामगिरी बजावली.


.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या