गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार
मुंबई, दादासाहेब येंधे : काल गणपती बाप्पा घरोघरी विराजमान झाला. कोरोनाचे सावट असल्याने यंदा साधेपणाने गणरायाचं उत्सव साजरा करण्यात येत आहे.
त्यातच गणपती विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिकेने कृत्रिम तलाव तयार केले आहेत. त्या कृत्रिम तलावांत दीड दिवसाच्या बाप्पाचे भावपूर्ण विसर्जन करण्यात येत आहे. महापालिकेकडून नागरिकांना योग्य ती मदत करण्यात येत आहे.

0 टिप्पण्या