चिंतामणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या जन आरोग्य वर्षाची रक्तदान शिबिराने सुरुवात
मुंबई, दादासाहेब येंधे, दि.२ : चिंचपोकळीचा प्रसिद्ध चिंतामणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने १०१ व्या वर्षी बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करण्याची परंपरा कायम ठेवत सोबत वर्षभर जनआरोग्य वर्षही साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. काल शनिवारी त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाने चिंतामणी जन आरोग्य वर्षाची सुरुवात रक्तदान शिबिराने झाली. यावेळी आमदार आशिष शेलार उपस्थित होते. या शिबिरात एकूण १८८ रक्तदान दात्यांनी रक्तदान केले.
ज्या गिरगावात जन्मलो त्या आमच्या गिरगावातील प्रसिद्ध अशा चिंचपोकळी च्या चिंतामणी गणेशोत्सव मंडळाने १०१ व्या वर्षानिमित्ताने जनआरोग्य वर्षाला सुरुवात केली आहे या उपक्रमाची सुरुवात करण्यासाठी मला चिंतामणी चा आशीर्वाद आहे अशी भावना व्यक्त करीत आमदार आशिष शेलार यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.




0 टिप्पण्या