जे जे रुग्णालय शिरले पाणी
मुंबई, दादासाहेब येंधे : वादळी वारा आणि पावसामुळे भायखळा येथे जे. जे. रुग्णालयातील मुख्य इमारतीत पाणी शिरले होते. त्यामुळे बाहेरून येणारे रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक, डॉक्टर्स सुरक्षारक्षक तसेच इतर कर्मचाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली होती.
मंगळवारपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर बुधवारीही कायम राहिल्यामुळे कधी नव्हे ते जे. जे. रुग्णालयात पाणी साचले होते. कर्मचाऱ्यांनाही नाईलाजाने पाण्यातून वाट काढतच रुग्णालयात ये-जा करावी लागत होती. रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जाताना कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली.
0 टिप्पण्या