Ticker

6/recent/ticker-posts

चिंचपोकळीत पावसामुळे दाणादाण

गल्लीतल्या झाडांनाही पावसाने झोडपले


मुंबई, दादासाहेब येंधे दि.६ : मुंबईत काल बुधवारी जोरदार वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे चिंचपोकळी, लालबाग, काळाचौकी या भागात कमरेपर्यंत पाणी साचले होते. 

प्रचंड सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे येथे झाडांच्या फांद्याही कोसळल्या. श्रीमोतांका इमारतीसमोर, तेलेगल्ली येथे भल्यामोठ्या आंब्याच्या झाडाच्या फांद्या वादळी वाऱ्यामुळे तुटुन खाली पडल्या. सुदैवाने तिथे कुणीही नव्हते, त्यामुळे जीवितहानी झाली नाही. 

तर चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कीलबिल नर्सरीचे पत्रे जोरदार हवेमुळे कोसळून खाली पडले. कित्येक इमारतींसमोर उभ्या असलेल्या दुचाकी पाण्याच्या लोंढयामुळे खाली पडलेल्या अवस्थेत दिसून येत होत्या. गटारातील कचरा, घाण मुख्य तसेच गल्लीतील रस्त्यांवर आल्यामुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे काम मात्र वाढले होते.









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या