Ticker

6/recent/ticker-posts

व्हिआयपी नंबरच्या नावाखाली ६ लाखांचा गंडा घालणारे गजाआड

मुंबई गुन्हे प्रकटीकरण शाखा-२ ची धडाकेबाज कारवाई


मुंबई (दादासाहेब येंधे): व्हिआयपी मोबाईल नंबर देण्याच्या नावावाली ६ लाख २२० रुपयांचा गंडा घालणाऱ्या २ जणांना गजाआड करण्यात आले. ही धडाकेबाज कारवाई मुंबई गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष २ च्या पथकाने केली. अटक आरोपी पोलीस रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध गुजरात व महाराष्ट्रात फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तसेच हे आरोपी हाती लागल्याने नाशिकमधील मुंबईनाका व मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल असलेले गुन्हे उघडकीस आल्याचे कक्ष २ च्या पथकाने सांगितले. काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका इसमाच्या मोबाईलवर भारती एअरटेल लिमिटेड कंपनीचे ९१९१९१९१९१, ९०००००००००, ७१११११११११, ७५५५५५५५५५, ७७७७७७७७७७, ९९९९९९९९९९ या व्हीआयपी नंबर्सच्या संदर्भात एसएमएस आला. हे आयपी नंबर पाहिजे असल्यास एसएमएसमध्ये नमूद केलेल्या जितू नावाच्या इसमासोबत संपर्क साधा, असा उल्लेख त्यात होता. व्हिआयपी नंबरच्या मोहापायी त्या इसमाने जितू नावाच्या इसमासोबत संपर्क साधला. त्याने भारती एअरटेल लिमिटेड कंपनीत चिफ प्रोडक्ट आणि एक्सपिरीयन्स मॅनेजर पदावर कार्यरत असल्याचे पटवून
देण्यासाठी कंपनीचे ओळखपत्र व्हॉट्सअँपवर पाठवले. 

सदर ओळखपत्र पाहून खात्री व्हिआयपी नंबरच्या नावारवाली ६ लाखांचा गंडा घालणारे गजाआड पटल्याने त्या इसमाने २ व्हिआयपी नंबर घेण्याची तयारी दर्शवली. प्रत्येक नंबरसाठी ५५ हजार ५५५ रुपये असे एकूण १ लाख ११ हजार ११० रुपये जितूने बँक खात्यात ट्रान्सफर करण्यास सांगितले. मोहापायी तो इसम व्हिआयपी मोबाईल नंबर घेण्यास तयार होताच जितूने कंपनीच्या विविध ऑऊफर्सची लालच दाखवली अन्‌ तो इसम आणखी ४ व्हिआयपी नंबर घेण्यास तयार झाला. जितूच्या सांगण्यानुसार त्या इसमाने स्टेट बँक ऑफ इंडिया व विजया बँकेत वेळोवेळी ६ लाख २२० रुपये भरले. 

दरम्यान, त्या इसमाने जितूकडे व्हिआयपी नंबरचे सीम कार्ड मागितले असता तो टाळाटाळ करू लागला. त्यामुळे त्या इसमाने भारती एअरटेल लिमिटेड कंपनीच्या कार्यालय गाठले. व्हिआयपी नंबरबाबत सर्व हकीगत सांगितली. जितूने दाखवलेले ओळखपत्र दाखवले असता या नावाची कोणतीच व्यक्‍ती भारती एअरटेल लिमिटेड कंपनीत कार्यरत नसल्याचे स्पष्ट झाले. या इसमाप्रमाणे इतरांचीही अशाच प्रकारे फसवणूक झाल्याने भारती एअरटेल लिमिटेड कंपनीचे नोडल अधिकारी यांनी बांगुर नगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. या प्रकरणी (गु.र.क्र. ५६४/२०२०) भादंवि कलम ४१९, ४२०, ४६८, ४७१ सह माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम ६६(क)(ड) नुसार गुन्हा दाखल केला.

गुन्ह्याचे स्वरूप पाहता सदर गुन्ह्याचा तपास मुंबई गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष २ च्या पथकाकडे वर्ग करण्यात आला. तपासादरम्यान या पथकाला खबऱ्याने आरोपींची माहिती दिली. त्या माहितीच्या आधारे मीरा रोड परिसरातून आरोपी परेश मोडावाला (४३) व शाहरुख नियाज अहमद (२५) यांच्या मुसक्या आवळल्या. या दोन्ही भामट्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना ३१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. हे  दोघेही पोलीस रेकॉर्डवरील आरोपी असून परेश विरुद्ध गुजरात राज्यातील अहमदाबाद, वडोदरा, भैसाना  पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत तर शाररुख याच्याविरुद्ध मीरा रोड, डोंबिवली, काशिमीरा, मुंबईनाका, वांद्रे या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असून मुंबईनाका व वांद्रे पोलीस ठाण्यांच्या गुन्ह्यांमध्ये त्याचा पोलीस शोध घेत होते.

व्हिआयपी मोबाईल नंबरच्या नावाखाली सुरू असलेली लुटालूट सह पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप कर्णिक, गुन्हे प्रकटीकरणचे उपायुक्त नंदकुमार ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त (मध्य) रवींद्र चिखले, गुन्हे शाखा कक्ष २ चे
प्रभारी पोलीस निरीक्षक संजय निकुंबे, पोलीस निरीक्षक मिलिंद काठे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश केकाण, पोलीस उपनिरीक्षक देशमुख, लोहकरे, हवालदार पाष्टे, बेळणेकर, लाड, पोलीस नाईक हृदयनारायण मिश्रा, राजेश सोनावणे, पोलीस शिपाई हरड, थिटमे आदी पथकाने उघडकीस आणली. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या