चोऱ्या करणाऱ्या आरोपीच्या डोंगरी पोलिसांनी आवळल्या मुसक्या - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

सोमवार, २४ ऑगस्ट, २०२०

चोऱ्या करणाऱ्या आरोपीच्या डोंगरी पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पॅरोलवर सुटल्यानंतर चोऱ्या करणाऱ्याला डोंगरी पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

मुंबई (दादासाहेब येंधे) : पॅरोल रजेवर तुरुंगाबाहेर आल्यानंतर पुन्हा चोऱ्या करणार्‍या सराईत आरोपीला चोरीच्या गुन्ह्यात पुन्हा बेड्या ठोकण्यात आल्या. सदर कारवाई डोंगरी पोलिसांनी केली. मेहराज उर्फ पेंढारी मुर्तुजा खान (२४) असे आरोपीचे नाव असून त्याच्या विरुद्ध भायखळा आणि वडाळा पोलीस ठाण्यांमध्ये ७ गुन्हे नोंद दाखल असल्याचे तपासात उघडकीस आले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास तक्रारदार वाडीबंदर पोलीस लाईन येथे दुचाकीवरून आलेल्या दुकलीने इसमाचा मोबाईल हिसकावून पळ काढला. या प्रकरणी इसमाने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या ३ तासाच्या आत मेहराज उर्फ पेंढारी
मुर्तुजा खान याच्या घोडपदेव परिसरात मुसक्या आवळण्यात आल्या. त्याची कसून चौकशी केली असता त्याने  मित्र वसीमच्या मदतीने मोबाईल पळवल्याची कबुली दिली. कावाईदरम्यान त्याच्याकडून गुन्ह्यातील वापरलेली
मोटारसायकल व चोरी केलेला मोबाईल जप्त करण्यात आला. खान हा घोडपदेव परिसरात राहत असून तो गॅस डिलिव्हरी करण्याचे काम करतो. त्याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न, चोरी, यासह विविध कलमांन्वये वडाळा व भायखळा पोलीस ठाण्यात ७ गुन्हे दाखल असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

सदर गुन्हा परिमंडळ १ चे उपायुक्‍त संग्रामसिंह निशानदार, सहाय्यक पोलीस आयुक्‍त अविनाश धमार्धिकारी, डोंगरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भागडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि घोरपडे, पोलीस उपनिरीक्षक आकाश पवार, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश दिनकर, पोलीस शिपाई इप्रान मुल्ला, पोलीस शिपाई राजू पवार, पोलीस शिपाई विश्वास शेलार आदी पथकाने उघडकीस आणला.



  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज