Ticker

6/recent/ticker-posts

विशेषांकासाठी आवाहन

विशेषांकासाठी आवाहन
मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्ट, डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष अड. एस. के. शेट्ये यांच्या संपादनाखाली व युनियनचे सरचिटणीस आणि मुंबई पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त सुधाकर अपराज यांच्या उपसंपादनाखाली गेली २३ वर्षे 'पोर्ट ट्रस्ट कामगार दिवाळी विशेषांक! काढला जातो. यावर्षी युनियनला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. यावर्षीच्या दिवाळी अंकासाठी लेखक-कवीनी आपल्या कथा, कविता, लघुकथा, लेख पाठवावेत असे आवाहन केले आहे. त्यासाठी कामगार कायद्यातील बदल, खाजगीकरण, कंत्राटीकरण, करोना 'काळातील नोकरकपात, देशासमोरील आर्थिक संकट, युनियनची शताब्दी, अत्यावश्यक सेवेत गोदीत चाललेले काम, हे विषय आहेत. पत्ता: मारुती विश्वासराव, कार्यकारी संपादक, पोर्ट ट्रस्ट कामगार, कामगार सदन, नवाब टँक रोड, माझगाव, मुंबई १०, ९८६९०२०८५८ किंवा mbptdgeu@gmail.com

  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या