राज्यात एसटी बस पुन्हा सुरु
मुंबई, दादासाहेब येंधे : मिशन बिगिन अंतर्गत राज्य सरकारने एक परिपत्रक जाहीर केले असून राज्यातील एसटी बससेवा पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असून प्रवाशांना ई पासची आवश्यकता असणार नाही. पण, जर खाजगी वाहनाने प्रवास करणार असतील तर ई पासशिवाय प्रवास करता येणार नाही. परिणामी, एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यामुळे दिलासा मिळाला आहे. तसेच खासगी ट्रॅव्हल्स कडून होणारी लूटमारिला यामुळे आळा बसेल.
कोरोनामुळे गेल्या चार महिन्यांपासून एसटी परिवहन सेवा राज्यभर बंद करण्यात आली होती. आता ती पुन्हा सुरू झाल्यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सोशल डिस्टंसिंग आणि लॉक डाऊनचे नियम पाळून एसटीने प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. आजपासून एसटी बस पुन्हा मोठ्या दिमाखात सुरू होत आहे. त्यामुळे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात एसटीने प्रवास करता येणार आहे.


0 टिप्पण्या