Ticker

6/recent/ticker-posts

भारत गणेशपुरे यांच्या मोबाईलची चोरी करणाऱ्याला ठोकल्या बेड्या


भारत गणेशपुरे यांच्या मोबाईलची चोरी करणाऱ्याला ठोकल्या बेड्या

मुंबई, दादासाहेब येंधे : काही दिवसांपूर्वी पश्चिम द्रुतगती महामार्ग कांदिवली येथे भररत्यावर मराठी मालिकांमधील विनोदी कलाकार भारत गणेशपुरे यांच्या मोबाईलची चोरी करण्यात आली होती. या प्रकरणी गणेशपुरे यांची तक्रार देखील नोंद करण्यात आली होती. सदर घटनेची नोंद पोलिसांनी व अधिकाऱ्यांनी गंभीरपणे घेतली होती. पोलीसांनी गुप्तपणे व तांत्रिक पद्धतीने सर्वेक्षण करुन पोलिसांना त्याला पकडून हातकड्या घालण्यास यश प्राप्त झाले आहे. सद्या टिव्ही मध्ये प्रसिद्ध असलेली व प्रेक्षकाच्या मनात भरलेली मालिका “चला हवा येऊ द्या' फेमस प्रसिद्ध अभिनेते तसेच विनोदाचा बादशहा भारत गणेशपुरे यांचा मोबाईल कांदिवली पश्चिम द्रुतगती महामार्गावर काही भामट्यांनी लंपास केला होता.

पोलीसांनी या प्रकरणी गंभीर दखल घेवुन त्याला हातकडया ठोकण्यास यश प्राप्त केले आहे. ह्या आरोपींबाबत पोलीसांनी सखोल चौकशी केली असता त्याचा कोणत्याही टोळीशी संबंध नसल्याची माहिती मिळाली आहे. तसेच गुन्हे प्रगटिकरण विभागाचे पोलीस पथक अजून ही सखोल चौकशी करीत आहेत.

यानुसार सदर गुन्ह्याबाबतीत आमचे पोलीस पथक योग्य दिशेने तपास करीत असल्याचे परिमंडळ १२ चे पोलीस उप-आयुक्त श्री.डी. एस.स्वामी यांनी वृतपत्रास वर्तवली आहे. प्रसिद्ध विनोदी कलाकार श्री.भारत गणेशपुरे यांना मंगळवार दिनांक ४ ऑगस्ट २०२० रोजी ही गंभीर घटना घडली होती. परंतु त्याच काळात कांदिवली पूर्व एक्सप्रेस हायवे, टाईम्स ऑफ इंडिया येथे असलेली दरड पावसामुळे अचानक कोसळल्यामुळे वाहनांच्या वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. याच घटनेमुळे चोरांनी ह्या बाबत फायदा घेतला होता.

याबाबत अनेक लोकांनी आपल्या फेसबुकवर ह्या घटनेबाबत तिरस्कार व्यक्त केला होता. त्यानुसार समतानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार ह्या अभिनेत्याने सर्व लोकांना आवाहन केले होते की, लॉकडाऊनच्या काळात प्रत्येक वाहानचालकाने सावधानता बाळगावी.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या