विठुराया तिरंगी रोषणाईने नटला
मुंबई, दादासाहेब येंधे : आज स्वातंत्र्यदिनानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात देखील तिरंगी रंगाच्या फुलांची सजावट करून साजरा करण्यात आला. मंदिर समितीच्या वतीने विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात तीन रंगांची फुले वापरून ही सजावट केली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमधून किती आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे अशा प्रतिक्रिया भविकांमधून येत आहेत.

0 टिप्पण्या