रस्ता खचल्यामुळे पेडर रोडची संरक्षक भिंत कोसळली
मुंबई, दादासाहेब येंधे : बी. जी. खेर मार्गाची एस. एन. पाटकर मार्गालगत (पेडर रोड) असलेली संरक्षक भिंत जोरदार पावसामुळे बुधवारी ५ ऑगस्टला खचली. यावेळी काही झाडे उन्मळून पडली. भूस्खलनामुळे जलवाहिन्या देखील बाधित झाल्याने या भागाला टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी गुरुवारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
दक्षिण मुंबईत पेडर रोडवरून बाबुलनाथ परिसराच्या दिशेने येताना इन. एस. पाटकर मार्ग लागतो. या रस्त्याच्या वरच्या बाजूस कमला नेहरू पार्क कडून येणारा बी. जी. खेर मार्ग असून या मार्गाची संरक्षक भिंत ही पाटकर मार्गाला लागून आहे. दक्षिण मुंबईत झालेल्या जोरदार पावसामुळे ही भिंत हळूहळू खचली. तसेच जोरदार वादळी वाऱ्यामुळे कित्येक झाडेदेखील उन्मळून पडली आहेत.
अग्निशामक दल, महापालिकेचे डी विभाग यंत्रणा यांच्याकडून मातीचा ढिगारा तसेच पडलेली झाडे हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.











0 टिप्पण्या