Ticker

6/recent/ticker-posts

दै. पुण्यनगरीचे संस्थापक मुरलीधर शिंगोटे यांचे निधन

दैनिक पुण्यनगरी चे संस्थापक संपादक मुरलीधर शिंगोटे यांचे निधन

मुंबई, दादासाहेब येंधे : दैनिक पुण्यनगरी चे संस्थापक, संपादक मुरलीधर अनंता ऊर्फ बाबा शिंगोटे (वय ८२) यांचे काल ६ ऑगस्ट रोजी दुपारी जुन्नर येथील गायमुखवाडी येथील निवासस्थानी निधन झाले. दैनिक मुंबई

 
चौफेर, दैनिक पुण्यनगरी, वार्ताहार या मराठी भाषिक वृत्तपत्रांसह अन्य भाषेत दैनिके प्रकाशित करून मुरलीधर शिंगोटे यांनी अनेकांना रोजगार दिला आणि ती वृत्तपत्रे यशस्वीपणे चालवून दाखवली. त्यांच्या निधनाने पुण्यनगरी वृत्तपत्र समूहाचा जणू आधारवड हरपला आहे.

वृत्तपत्र विकताना सर्वसामान्यांना समजेल आणि वाचता येईल अशा भाषेतले वृत्तपत्र काढण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते. १९९४ मध्ये त्यांनी मुंबई चौफेर नावाचे सायंदैनिक सुरू केले. यानंतर दैनिक आपला वार्ताहर, दैनिक यशोभूमी, दैनिक कर्नाटक मल्ला, तमिळ टाईम्स, हिंदमाता ही दैनिके सुरु केली. यातल्या दैनिक पुण्यनगरीचे मुहूर्तमेढ १९९९ मध्ये रोवली. मराठी भाषिक वृत्तपत्रांसोबत इतर भाषिक दैनिक प्रकाशित करणारे मुरलीधर शिंगोटे हे एकमेव होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या