Ticker

6/recent/ticker-posts

रेल्वे पोलिसांतर्फे कोरोनाबाबत जनजागृती

सोशल डिस्टनसिंगचे पालन, योग्य नियोजन


मुंबई, दादासाहेब येंधे : मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पोलीस ठाणेतर्फे प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी पोलिसांना अत्याधुनिक लाऊडस्पीकर दिले आहेत. याद्वारे पोलीस उद्घोषणा करून प्रवाशांमध्ये फिजिकल डिस्टनसिंग पाळण्याचे, रांगेत चालत राहा अशाप्रकारे कोरोनापासून बचाव करण्याबाबत जनजागृती करताना दिसून येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या महत्त्वाच्या व सदैव गर्दीने गजबजलेल्या लोकल स्थानकांवर छत्रपती शिवाजी महाराज लोहमार्ग पोलीस ठाणे अंतर्गत वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत बावधनकर यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रांगेमध्ये ओळखपत्र तपासणी करून व्यवस्थितपणे सामाजिक अंतराचे पालन करून लोकल प्रवासामध्ये प्रवास करण्यासाठी स्थानकात प्रवेश दिला जात आहे.

सिएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाणेचे हेड कॉन्स्टेबल मोहिते, बक्कल नं. ९४१ हे अत्याधुनिक पोर्टेबल लाऊड स्पीकरद्वारे मास्क लावणे, सामाजिक अंतर राखणे, रांगेतून प्रवास करणे अशी मोलाची जनजागृती करीत आहेत. तर सदर पोलीस ठाणेतील पुरुष व महिला पोलीस कर्मचारी हे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची ओळखपत्रे तपासून त्यांना स्थानकात सोडत आहेत. प्रवाशीदेखील पोलिसांच्या सूचनांचे पालन करीत आहेत. अतिशय नियोजनबद्ध पध्दतीने येथे पोलीस दल आपले कर्तव्य बजावताना दिसून येत आहे.


लाऊडस्पीकर द्वारे कोरोनाबाबत जनजागृती करताना पोलीस



छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रांगेत प्रवाशांना स्थानकात सोडताना पोलीस बांधव




टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या