दासावा चे दत्ता कामथे यांचे निधन
दासावाच्या वाचनालयाचे संगणीकरण आणि ११० वर्षे पूर्ण झालेल्या संपूर्ण वास्तूला आधुनिक डोलारा उभा करण्यात त्यांचा फार मोठा वाटा होता. सर्वसाधारण सभासद वाचकांना सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी त्यांची सतत धडपड सुरू असायची. ७२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, शिवाजीपार्क येथे भव्यदिव्य स्वरूपात शिस्तबद्ध आणि नियोजित कार्य पद्धतीने आयोजित करून एक वेगळाच आदर्श साहित्य क्षेत्रात सर्वांपुढे ठेवला. यामध्ये कामथे यांचा सिंहाचा वाटा होता. वाचनालयाच्या वतीने गेली अनेक वर्षे सतत विविध स्तरांवरील विविध सांस्कृतिक, साहित्यिक, आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित संस्थेच्या वतीने केले जायचे. शिवाय अन्य संस्था, संघटना आदींना विविध कार्यक्रमासाठी प्रोत्साहन देण्याचे कार्य ते सतत करण्यात ते नेहमीच पुढाकार घेत. वाचनालयाचे सन २०१८ मध्ये दोन दिवसांचा मुंबई शहर ग्रंथोत्सव २०१८ ग्रंथप्रदर्शन व विक्री आणि विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालय यांच्यावतीने आयोजित करण्यात दासावाने फार मोठा आपल्या कार्यकारिणीच्या आणि सेवक वर्गाच्या आणि अन्य जणाच्या सहकार्याने यशस्वी करून घेण्यात कामथे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले होते.
कामथे यांनी यापूर्वी श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादर या संस्थेत प्रमुख कार्यवाह व सदस्य म्हणून कार्यकारणी मध्य्ये कार्यरत होते.तसेच ते मुंबई खो खो संघटनेत कै. दत्ता प्रधान अध्यक्ष व दत्ता मोरे प्रमुख कार्यवाह असताना कामथे यांनी उपाध्यक्ष पद सांभाळलेले होते.काही वर्षे त्यांनी मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ, वडाळा आणि कुस्तीच्या मुंबई तालीम संघटनेत कार्य केलेले होते. त्यांचा अनेक क्रीडा संघटनेशी,सामाजिक संस्थाशी जिव्हाळ्याचे संबंध होते.

0 टिप्पण्या