घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांकडून
१३ लाखांचा ऐवज हस्तगत
पुणे, दादासाहेब येंधे : मा. पोलीस आयुक्त पुणे शहर व पोलीस सहआयुक्त, पुणे यांनी पुणे शहरामध्ये घरफोडी व इतर चोरीचे गुन्हे घडु नये व मालमत्तेच्या गुन्हयांना प्रतिबंध व्हावा यासाठी पोलीस अभिलेखावरील गुन्हेगारांचे हालचालीवर नजर ठेवुन त्यांचा शोध घेवुन त्यांचेविरुध्द कडक कारवाई करण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी यांना वेळोवेळी आदेश दिलेले आहेत तसेच क्रिप्स सारख्या योजना राबविल्या जात आहेत.
युनिट-१ गुन्हे शाखा पुणे येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी हे पोलीस अभिलेखावरील गुन्हेगारांची माहीती काढून त्यांना चेक करत असताना अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने पोलीसांनी दिनांक २१ जुलै २०२० रोजी रुपीनगर निगडी पुणे या भागात सापळा लावुन सराईत गुन्हेगार विक्रम विठठलसिंग ठाकुर वय वर्षे३२ रा.रुपी नगर निगडी पुणे सध्या रा. गुलबर्गा कर्नाटक यास ताब्यात घेतले व त्याचेकडे सखोल तपास केला असता त्याने पुणे शहर व परिसरात घरफोडी चो-या केल्याचे कबुल केले व चोरलेल्या सोन्याचे दागिण्याची त्याचे साथीदारसह विल्हेवाट लावल्याची माहीती दिली पोलीसांनी मुपो. दिघंची ता.आटपाडी जिल्हा -सांगली येथे जावुन त्याचा साथीदार व सराफ व्यवसाय करणारा रामचंद्र ऊर्फ हनुमंत दगडु मोहीते वय वर्षे ३१ यास ताब्यात घेतले व दोघांन गुन्हयात अटक करुन तपास केला असता विक्रम ठाकुर याने पुणे शहरामध्ये कात्रज , भारती विद्यापीठ, सिंहगड रोड, बावघान, रहाटणी , चिखली या परिसरात घरफोडी चो-या केल्याचे उघडकीस आले आहे. आरोपी वेगवेगळया भागात फिरुन रेकी करुन बंद घराची पाहणी करुन कुलुप तोडुन चोरी करत असल्याचे व तो नेहमी फुल बाहयांचाशर्ट घालुन हातातील धातुच्या कडयामध्ये कटावणीसारखे हत्यार लपवुन ठेवुन कोणत्याही प्रकारची नशा करुन घरफोडी चोरीचे गुन्हे करत असल्याचे व त्याचा साथीदार रामचंद्र मोहीत याचेसह चोरीच्या दागिण्याची विल्हेवाट लावत असल्याचे उघडकीस आले आहे. तसेच चोरीतील काही दागिने त्याने त्याचे गुलबर्गा कर्नाटक येथे राहणारे सासु सासरे यांचे घरात लपवुन ठेवल्याचे तसेच काही दागिने तेथील सराफ दुकानदारांना विकल्याचे आढळुन आले आहे . पोलीसांनी गुलबर्गा कर्नाटक येथे जावुन सोने व चांदीचे दागिने जप्त केले आहेत.
आरोपींकडुन २६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ५५६ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, सॅमसंग कंपनीचा टिव्ही असा एकुण बारा लाख सत्तर हजार रुपयाचा ऐवज हस्तगत करण्यात आलेला आहे. त्यांचेकडुन भारती विदयापीठ पोलीस स्टेशन कडील तीन, सिंहगड रोड पोलीस स्टेशन कडील एक, हिंजवडी, वाकड, चिखली पोलीस स्टेशन कडील प्रत्येकी एक असे सात गुन्हे केल्याचे उघडकीस आलेले आहेत. त्याचेकडुन आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. मा. एम. ओ. शेख , तेरावे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पुणे यांचे न्यायालयात आरोपींना हजर केले असता त्यांना दिनांक. ०३/०८/२०२० रोजी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेले आहे.
आरोपी विक्रम ठाकुर हा घरफोडी चो-या करणारा सराईत व अटटल गुन्हेगार त्यांचेविरुध्द यापुर्वी पुणे शहर व पिंपरी चिंचवड परिसरात घरफोडी व इतर चोरीचे ३८ पेक्षा जास्त गुन्हे व खुनाचा गुन्हा दाखल आहेत.
सदर कामगिरी गुन्हे शाखा, पुणे शहरचे अपर पोलीस आयुक्त श्री. अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे पुणे शहर श्री. बच्चन सिंग, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे पुणे डॉ. शिवाजी पवार यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट - १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. महेन्द्र जगताप, पथकातील पोलीस उप निरीक्षक संजय गायकवाड हनुमंत शिंदे व पोलीस कर्मचारी गजानन सोनुने, विजेसिंग वसावे, अशोक माने, उमेश काटे, सुभाष पिंगळे, अजय जाधव , इम्रान शेख , संजय बरकडे, अनिल घाडगे, तुषार माळवदकर महिला पोलीस शिपाई अश्विनी केकान यांनी केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेन्द्र जगताप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक संजय गायकवाड हे पुढील तपास करत आहेत.


0 टिप्पण्या