'पती', 'पत्नी' और 'वो' चा ट्रॅफिकमध्ये ड्रामा
मुंबईत घरातील वाद, रस्त्यावर ड्रामा
मुंबईत घरातील वाद, रस्त्यावर ड्रामा
मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबईतील वर्दळीच्या पेडर रोडवर शनिवारी एक ड्रामा पाहायला मिळाला. संध्याकाळी पाचच्या सुमारास एक ३१ वर्षीय व्यक्ती काळ्या रंगाच्या रेंज रोव्हर कारमधून गर्लफ्रेंड सोबत जात होता. त्याला कल्पनाही नसतांना अचानक त्याच्या पत्नीने त्याला रस्त्यात पकडले. आपल्याला धोका दिल्याचा राग मनात धरून तिने पतीला रस्त्यात अडवून आरडाओरड करत जोरजोरात राडा करून काही काळ ट्रॅफिक जॅम केला होता. तळपायाची आग मस्तकात गेल्याने तिने तरुणीलाही मारहाण केली. मुंबई ट्रॅफिक पोलीस घटनास्थळी पोहोचून त्या दोघांची समजूत काढून त्यांना बाजूला केले.
0 टिप्पण्या