दहावी बारावीचे निकाल जुलै मध्येच लागणार
बारावीच्या परीक्षेचा निकाल १५ ते २० जुलै तर दहावीच्या परीक्षेचा निकाल १३ जुलैपर्यंत जाहीर करण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाकडून सुरू असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. पालकमंत्री या नात्याने त्यांनी नुकतीच शासकीय बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की दहावी व बारावीच्या परीक्षांचा निकाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दोन्ही निकाल याच महिन्यात लागतील असे प्रयत्न सुरू आहेत.
बारावीच्या परीक्षांचा निकाल १५ ते २० जुलै तर दहावीच्या परीक्षेचा निकाल ३१ जुलैपर्यंत लावण्याचा शालेय शिक्षण विभागाचा निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले. या दोन्ही वर्गांच्या निकालाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता आहे.
साधारणपणे जास्तीत जास्त जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत निकाल लागतात. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे निकालात अडसर निर्माण झाला असून लवकरात लवकर निकाल लावण्यात येतील.
0 टिप्पण्या