Ticker

6/recent/ticker-posts

यंदा लालबागचा राजा नाही

यंदा लालबागचा राजा नाही

मुंबई, दादासाहेब येंधे: कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना न करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता गणेशोत्सव साजरा न करण्याचा महत्त्वाचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्याऐवजी मंडळाकडून आरोग्य सेवेच्या दृष्टीने महत्त्वाचे उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये रक्तदान शिबिर आणि प्लाझमा दानाचा समावेश आहे. यासाठी मंडळाकडून कॅम्पचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्य कोरोनाच्या वेढ्यात आहे. त्यातच गणेशोत्सव अवघ्या काही महिन्यांवर आला आहे. लालबागच्या राजाला दरवर्षी मोठी गर्दी होते. लाखो भाविक राजाच्या दर्शनाला हजेरी लावतात. मात्र,  सध्याची परिस्थिती पाहता सदर मंडळाने गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी आरोग्य सेवा करण्याचा निर्णय मंडळाकडून घेण्यात आला आहे. लालबागच्या राजाला ८६ वर्षांची परंपरा आहे. मंडळाने यावर्षी "आरोग्य उत्सव" साजरा करण्याचे ठरविले आहे.  हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या