भारताने घातली ५९ चिनी अँपवर भारतात बंदी
मुंबई, दादासाहेब येंधे: भारत चीन यांच्यात सध्या ताणलेल्या संबंधांवरून ५९ चिनी अँपवर भारतात बंदी घालण्याचा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. भारतीयांची वैयक्तिक माहिती गोळा करून तो डेटा चीन चोरी करत असल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. टिक -टॉक सह यूसी ब्राउजर, कॅम स्कॅनर सारखी आणखीही लोकप्रिय अँपला भारतात बंदी घातली आहे. बंदी घातलेल्या ५९ अँप्स देशाचे सार्वभौमत्व सुरक्षा आणि अखंडतेसाठी घातक बनत होते. चीन या अँपद्वारे भारताच्या माहितीशी छेडछाड करून एखाद्या भागातल्या लोकांच्या आवडीनिवडी, पोशाख, बोलणं चालण यांचा अभ्यास करून भारतीयांचा माहिती हॅक करू शकला असता. त्यामुळे भारताच्या गुप्तचर यंत्रणांनी धोकादायक अँपची यादी केंद्र सरकारला जाहीर केल्यानंतर भारत सरकारने ५९ अँपवर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतला.
आता ५९ अँप बंद झाल्यामुळे भारतातील या अँपच्या युजरचं काय होणार असा प्रश्न यानिमित्ताने पुढे येतोय पण टिक-टॉकला टक्कर देणारा मित्रो आणि चिंगारी अँपसुद्धा भारतात लोकप्रिय होत आहेत.
2 टिप्पण्या
अभिमान वाटतो.भारतीयांचा
उत्तर द्याहटवाचिनी app काढूनच टाका, मोबाईलमधून
उत्तर द्याहटवा