Ticker

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपुरात शासकीय महापूजा संपन्न

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपुरात शासकीय महापूजा संपन्न
दादासाहेब येंधे: कोरोनामुळे जगावर तसेच देशावरही मोठे संकट उभे आहे. बा...विठ्ठला, कोरोनाचे हे संकट लवकरात लवकर दूर करून महाराष्टाला आणि साऱ्या विश्वाला कोरोनामुक्त कर.., बळीराजाला सुखी ठेव..सर्वांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण कर, समाधान अन भरभराट येऊ दे, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंढरपूर येथे श्रीविठ्ठलाच्या चरणी घातले.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय पूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याहस्ते पार पडले. सोबत पर्यावरमंत्री आदित्य ठाकरे हेही होते. मुख्यमंत्र्यांसमवेत महापूजेचा मान विठ्ठल मंदिरातील विणेकरी असलेले ज्ञानदेव बडे आणि त्यांच्या पत्नीला मिळाला.




टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या