Ticker

6/recent/ticker-posts

पुणे शहर युनिट-१ गुन्हे शाखा यांची उत्तम कामगिरी

पुणे शहर युनिट-१ गुन्हे शाखा यांची उत्तम कामगिरी


चार वर्षांपासून पाहिजे असलेला आरोपीला केले जेरबंद

पुणे: युनिट-१ च्या हद्दीत पाहिजे असलेला फरारी तडीपार आरोपींचा शोध घेत असताना पोलिस नाईक सचिन जाधव यांना मिळालेल्या बातमीनुसार विश्रामबाग पोलिस स्टेशन गु.र.न.१७९/२०१६ भा.द. वि कलम ४५२, ४२७, ५०६-२, ३४ या गुन्ह्यातील ४ वर्षांपासून पाहिजे असलेला आरोपी नामे सुमित नाना वैराट, वय_३० राहणार ४४३ सदाशिव पेठ,पुणे (पाहीजे आरोपी यादी, क्रमांक-४४) यास वैकुंठ स्मशानभूमीच्या पाठीमागे पुलाजवळ मिळून आला. त्यास युनिट-१ कडील स्टाफ ने ताब्यात घेतले त्यावर यापूर्वी
१) विश्रामबाग पोलिस स्टेशन गु र न १३७/२०१६ भा द वी कलम ३२४,३२४,५०४,३४. 
२) विश्रामबाग पोलिस स्टेशन गु र न ३४९/२०१७ आर्म अॅक्ट ४/२५भा द वी कलम ३२३,५०४,३४.
३) फरासखाना पोलिस स्टेशन गु र न १५८/२०१२ भा द वी कलम ३९२,४५२,३४. 
४) कोथरुड पोलिस स्टेशन गु र न ३६५/२०१२ भा द वी कलम ३९२,३४ 
५) डेक्कन पोलिस स्टेशन गु र न २०१/२०१२ भा द वी कलम ३९४ असे  एकूण ५ गुन्हे दाखल आहेत. त्यास पुढील कारवाई कामी विश्रामबाग पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले असून ते पुढील तपास करीत आहेत.

सदरची कारवाई ही श्री. अशोक मोराळे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. बच्चन सिंह,  पोलीस उपायुक्त, गुन्हे. श्री. डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे प्रतिबंध यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अरुण वायकर, पोउप निरीक्षक संजय गायकवाड, पोलीस कर्मचारी सचिन जाधव, संजय बरकडे, इरफान मोमीन, तुषार माळवदकर, अरविंद चव्हाण, सुभाष पिंगळे, या पथकाने केली.









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या