Ticker

6/recent/ticker-posts

मुंबई शहर व उपनगरात पावसाचे आगमन

मुंबई शहर व उपनगरात पावसाचे आगमन
मुंबई, दादासाहेब येंधे :  मुंबई व उपनगरात आज पावसाने हजेरी लावली. मुंबई शहराच्या पश्चिम व पूर्व उपनगरात सकाळी गेल्या काही तासांपासून पाऊस कोसळत होता. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. पावसामुळे मुंबईतील सायन, परळ, लालबाग, भेंडीबाजार अशा अनेक भागांत पाणी साचले होते. शिवाय उपनगरातील अंधेरी, सांताक्रुझ,  घाटकोपरमध्येही संततधार सुरू होती. तिथेही काही प्रमाणात पाणी तुंबले होते. या पाण्यातूनच सकाळी चाकरमानी वाट काढत कामावर जाताना दिसत होते. बऱ्याच दिवसांपासून पाऊस नसल्याने उकाडा निर्माण झाला होता. मात्र, आज पडलेल्या पावसामुळे वातावरणात काही प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे.

काळाचौकी

भेंडी बाजार, जे. जे रुग्णालय

लालबाग















टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या