Ticker

6/recent/ticker-posts

मालवणीत १८ लाखांचा गांजा जप्त; तीन जणांना अटक

मुंबई, दादासाहेब येंधे : अमली पदार्थांच्या विरोधात मालवणी पोलिसांनी मोठी कारवाई करून तब्बल ३७ किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून मालवणी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

लवकुश फुलचंद वर्मा, अंकित कुमार मानसिंग आणि सेतू रामकुमार वर्मा अशी अटक आरोपींची नावे असून ही कारवाई मारवे रोडवरील पुनम रोज नर्सरी परिसरात करण्यात आली आहे. या ठिकाणी मालवणी पोलिसांच्या निगराणी पथक गस्त घालत असताना त्यांना संशयित हालचाल दिसून आल्याने पोलिसांनी तपासणी केली त्यावेळी आरोपींच्या ताब्यातून विक्रीसाठी आणलेला तब्बल १८ लाख ५० हजार रुपयांचा ३७ किलो गांजा आढळून आला. हे तिघे आरोपी प्रतापगड, उत्तर प्रदेश येथील राहणारे आहेत. सदर कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ-११ चे संदीप जाधव यांच्या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या