Ticker

6/recent/ticker-posts

वसा जनसेवेचा कार्यवृत्तांत विनोद तावडे यांच्या हस्ते प्रकाशित

मुंबई, दि. ७ : जीवन प्रबोधिनी ट्रस्ट, मुंबई या संस्थेच्या सामाजिक, वैद्यकीय आणि शैक्षणिक कार्याचा आढावा घेणाऱ्या "वसा जनसेवेचा" नामक विशेष कार्यवृत्तांत अहवालाचे अधिकृत प्रकाशन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सचिव व खासदार मा. श्री. विनोदजी तावडे यांच्या शुभहस्ते नुकतेच संपन्न झाले.

या महत्त्वपूर्ण प्रकाशन सोहळ्याप्रसंगी जीवन प्रबोधिनी ट्रस्टचे संस्थापक श्री. सत्यवान नर अध्यक्ष गणेश पार्टे, सरचिटणीस प्रशांत पवार, सल्लागार मेघनाथ शेट्टी, उपाध्यक्ष नंदकुमार चिबडे, अविनाश पवार संस्थेचे इतर प्रमुख पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संस्थेने गेल्या काही वर्षांत केलेल्या उल्लेखनीय कार्याची माहिती समाजापर्यंत पोहचवण्याच्या उद्देशाने हा वार्षिक कार्यवृत्तांत अहवाल तयार करण्यात आला आहे. अहवालाचे प्रकाशन केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना भाजपा राष्ट्रीय सचिव विनोदजी तावडे यांनी जीवन प्रबोधिनी ट्रस्टच्या कार्याचे भरभरून कौतुक केले. ते म्हणाले, "गोरगरीब आणि गरजू घटकांपर्यंत पोहोचून समाजहित साधण्याचे काम ही संस्था सातत्याने करत आहे, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. संस्थेचा हा अहवाल त्यांच्या पारदर्शक आणि निष्ठेच्या कामाची पावती आहे".

याप्रसंगी संस्थेचे संस्थापक सत्यवान नर यांनी संस्थेच्या आगामी उपक्रमांविषयी व ध्येयांबद्दल माहिती दिली. तसेच, विनोदजी तावडे यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल त्यांचे विशेष आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या