Ticker

6/recent/ticker-posts

बोलण्यात गुंतवून फसवणूक करणाऱ्यास अटक

मुंबई, दादासाहेब येंधे : बोलण्यात गुंतवून दागिन्यांची चोरी करून फसवणूक करणाऱ्या नरेश उर्फ नऱ्या विजयकुमार जयस्वाल या सराईत गुन्हेगाराला भोईवाडा पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. नरेश विरुद्ध विविध पोलीस ठाण्यात ५९ गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले आहे. यापूर्वी याच गुन्ह्यात त्याचा सहकारी गणेश दशरथ बारकडे याला पोलिसांनी अटक केली होती. कारवाईदरम्यान नरेश हा पळून गेला होता. अखेर त्याला कल्याण येथून पोलिसांनी अटक केली आहे. 

यातील तक्रारदार हे ७१ वर्षांचे असून ते परळ येथे राहतात. ३९ मार्चला ते कामासाठी बाजारात जात होते. त्यावेळी बोलबच्चन करून दोन अज्ञातांनी त्यांच्या गळ्यातील एक लाखांची सोन्याची चैन चोरी करून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार वेळीच लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. यावेळी पळून जाणाऱ्या गणेश बारकडे याला स्थानिक नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. या प्रकरणी वयोवृद्धाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गणेश व त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या