Ticker

6/recent/ticker-posts

गॅसची चोरी अन बाईकवर स्वारी

चोरट्याकडून ३ बाईकसह ४५ सिलेंडर जप्त

मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरातून गॅस सिलेंडर चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला पवई पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीकडून ४५ गॅस सिलेंडर व चोरीच्या ३ मोटरसायकल जप्त केल्या आहेत.


सदर आरोपीने पवई पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक दुचाकी गाडी चोरी करुन दोन गॅस सिलेंडर चोरी केली होती. या गॅस सिलेंडर चोरी आणि बाईक चोरी प्रकरणी पवई पोलिसांनी गुन्हा दाखल करून परिसरात असलेले सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपास करत ठाणे वर्तक नगर परिसरातून एका व्यक्तीला ताब्यात घेतले होते. अटक केलेल्या आरोपीचे नाव राज चंद्रकांत कांबळे (वय,४५) असून त्याच्याकडून पवई पोलिसांनी ३ बाईक त्यासोबत मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरातून चोरी केलेले एकूण ४५ गॅस सिलेंडर सुद्धा जप्त केले आहेत. अटक केलेल्या आरोपीविरुद्ध मुंबईत दहापेक्षा जास्त गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यासोबतच या आरोपीसोबत चोरी करण्यात आणखी  कुणी सामील आहे का याचा  पोलीस अधिक तपास करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या