Ticker

6/recent/ticker-posts

गँगस्टर बनायचं होतं, मित्रांसोबत मिळून थेट..; रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणात आणखी एकाला अटक

मुंबई, दादासाहेब येंधे : दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. उत्तर प्रदेशच्या टास्कफोर्सच्या मदतीने मुंबई पोलिसांनी उत्तरप्रदेशमधील आग्रा इथून प्रदिपकुमार रामसिंग उर्फ छोटू याला अटक केली आहे.

तपासात आरोपींना या कामासाठी भरमसाठ पैशांची ऑफर देण्यात आली होती. यात प्रदीपकुमारचाही समावेश होता. प्रदीपकुमारचा सहभाग निश्चित झाल्यानंतर गुन्हे शाखेचे पोलिस त्याच्या मागावर होते. मात्र पोलिसांना गुंगारा देत चार महिने प्रदीप कुमार फरार होता.


प्रदीप हा घरी परतणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उत्तरप्रदेश टास्कफोर्सच्या मदतीने प्रदीपला आग्रा अशोकनगर, न्यू बस्ती पक्की तलैया इथून अटक केली आहे. प्रदीपकुमार हा शुभम लोणकरच्यासोशल मीडियावरील बातम्या आणि पोस्ट पाहून प्रभावित झाला होता. अंडरवर्ल्डमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सनी, दीपू आणि सोनू या साथीदारांसोबत गुन्ह्यात सहभागी झाल्याचं त्याने कबूल केलं आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या