Ticker

6/recent/ticker-posts

एटीएम सेंटरमध्ये खातेदारांना लुटणारा अटकेत

मुंबई,  दि. २४ : एटीएम सेंटरमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्याच्या बहाण्याने डेबिट कार्डची अदलाबदल करून त्यांच्या खात्यातून पैसे काढणाऱ्या भामट्याला नुकतीच अटक करण्यात आली.

फ्रान्सिस पॅट्रिक फर्नाडिस असे आरोपीचे नाव असून सदर आरोपी पकडला  गेल्यामुळे ३ गुन्ह्यांची उकल होण्यास मदत झाली असून, त्याच्याकडून ७१ एटीएम कार्ड हस्तगत करण्यात कस्तुरबा मार्ग पोलिसांना यश आले आहे.

७ फेब्रुवारी रोजी स. ११:४५ च्या सुमारास ७५ वर्षीय फिर्यादी कार्टर रोड क्रमांक ९ येथील एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेले. यावेळी आरोपीने मदतीचा बहाणा करून त्यांचा पिन क्रमांक पाहिला व डेबिट कार्डची अदलाबदल करून त्यांच्या खात्यातून १० हजार रुपये काढून फसवणूक केली. या प्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंद केला. या गुन्ह्याचा तपास साहाय्यक पोलिस निरीक्षक सरला थोरात, उपनिरीक्षक धीरज वायकोस, उपनिरीक्षक अनिकेत शिंदे व पोलिस पथकाने तपास करून आरोपीला अटक केली. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीकडून विविध बँकांच्या वेगवेगळ्या बँकांचे ७१ डेबिट कार्ड जप्त केले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या