Ticker

6/recent/ticker-posts

रेल्वे पोलीसांनी २७२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने केले परत

सीएसएमटी लोहमार्ग पोलीसांची उत्कृष्ट कामगिरी

मुंबई, दादासाहेब येंधे : तक्रारदार तल्लाह मोहम्मद झ़ाकीर अन्सारी, (वय ३३) वर्षे हे दिनांक ०२/११/२०२३ रोजी कामावर येत असताना अंबरनाथ ते सीएसएमटीची असा प्रवास करित असताना कुर्ला रेल्वे स्टेशन गेल्यावर त्यांनी त्यांचे जवळ असणारी २७२ ग्रॅम वजनाची सोन्याची बॅग बाजुला ठेवली. सदर गाडी ११.४० वा. भायखळा रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक ०२ वर आली अस्ता तक्रारदार हे सदर बॅग गाडीमध्ये विसरून खाली उतरून निघून गेले. 

ब्रिज चढून गेल्यावर त्यांना त्यांची बॅग गाडीत विसरल्याचे लक्षात आले. परंतु त्यावेळी गाडी निघून गेली होती. त्यांनी लागलीच पाठीमागील गाडी पकडून सीएसएमटी रेल्वे स्टेशन येथे येवून त्या गाडीत बॅगेची शोधाशोध केली. परंतु त्यांना त्यांची बॅग मिळून आली नाही. त्यामुळे त्यांनी सोन्याची दागिने ठेवलेली बॅग कोणतीही अज्ञात चोरट्याने चोरी केलेबाबत सीएसएमटी रेल्वे पोलिस ठाणे तक्रार दिली. त्यावरून सीएसएमटी रेल्वे पोलिस ठाणे गु. रजि. नं. १२६/२०२३ कलम ३७९) भादवि. अन्वये दिनांक ०२/११/२०२३ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता.


सदर गुन्हा दाखल झालेनंतर सीएसएमटी रेल्वे पोलिस ठाण्याचे तात्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय तायडे यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलिस उप निरीक्षक सांगळे व डीबी पथकाने सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपी निष्पन्न केला. सदर आरोपीचा गुप्त बातमीदार यांच्याकडून माहिती प्राप्त करून अख्तर हुसेन मुस्तफा हुसेन शेख (वय, ६२ वर्षे) याचा शोध घेवून त्याचेकडून २७२ ग्रॅम वजनाचे १२,१५,०००/- रु किमतीचा मुद्देमाल जप्त केला.


सदर जप्त २७२/- ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने किंमत १२,१५,०००/- रु मुद्देमाल हा बऱ्याच महिन्यांपासून मुद्देमाल या शाखेत जमा असून त्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी कटारे यांचे मार्गदर्शनखाली पो.हवा. ३५३ बिराजदार यांनी मा. न्यायालयात सतत पत्रव्यवहार व पाठपुरावा करून सदरचा मुद्देमाल फिर्यादी यांना परत मिळवून देण्याकरिता प्रयत्न केले असता मा. न्यायालयाकडून दिनांक ३१/०७/२०२६ रोजी तक्रारीतील मुख्य मालक यांना मुद्देमाल परत करण्याचे आदेश प्राप्त झाले.

सदरची कामगिरी मा. राकेश कलासागर, पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई, मा. प्रज्ञा झेडगे, पोलीस उप आयुक्त, मध्य परिमंडळ, लोहमार्ग मुंबई, मा. सुधाकर शिरसाठ, सहायक पोलीस आयुक्त, सीएसएमटी विभाग, लोहमार्ग मुंबई यांनी क्राईम मिटींग व पोलीस ठाणे भेटी दरम्यान दिलेल्या सूचना व मार्गदर्शनप्रमाणे संभाजी कटारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनखाली पोउनि अर्जुन सांगळे यांच्यासह पोहवा/०४ चव्हाण, पोहवा/२२४१ आढाड, पो.हवा./३५३ बिराजदार, पो.शि./५७६ भारुड, पो.शि. ११२४ रननवरे, पो.शि. १५२६ चव्हाण, यांनी पार पाडली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या